सिल्लोड तालुक्यातील ग्राम सिरोळा गावात शोककळा
सिल्लोड: शब्दसंदेश न्यूज नेटवर्क, दि.१४
सिल्लोड तालुक्यात शनिवारी (दि.१४) दुपारी विजेच्या कडकडासह झालेल्या मुसळधार पावसाने मोठे संकट ओढवले. वीज पडून दोन सख्ख्या भावासह एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर चार जनावरही दगावली. या घटनेने तालुक्यावर शोककळा पसरली आहे. मृतांच्या कुटुंबीयांना शासनाकडून योग्य ती मदत देण्याची मागणी जोर धरत आहे.
सारोळ्यात काकडे बंधू वर काळाचा घाला
मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास तालुक्यात विजांच्या प्रचंड कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. याच दरम्यान सिरोळा शिवारातील गट क्रमांक २९४ मध्ये वीज कोसळून यश राजू काकडे (वय १४) आणि रोहित राजू काकडे व (२१) या दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना घडली तेव्हा ते शेतात काम करत असल्याची प्राथमिक माहिती आहे.