मावळ शब्दसंदेश न्यूज, दि.१५
मावळ तालुक्यात आज एक मोठी दुर्घटना घडली असून कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील जुना पूल कोसळल्याची घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार, २५ ते ३० पर्यटक नदीत बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी तळेगाव पोलीस पिंपरी चिंचवड, अग्निशामक दल, पीएमआरडीए अग्निशामक दल, लष्कराचे एनडीआरएफ टीम घटनास्थळी दाखल झाली आहे.
मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे शहरजवळील प्रसिद्ध पर्यटन स्थळ कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर असलेला जुना पूल कोसळून दुर्घटना घडली आहे. रविवार असल्याने पर्यटकांची गर्दी होती. अशातच पूल कोसळून अनेक पर्यटक इंद्रायणीत बुडाल्याची भीती आहे. दोन दिवसापासून मावळ परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असून इंद्रायणीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. यामुळे नदीत पडलेल्या पर्यटकांना बचाव वाचविण्याचे संस्थेचे प्रयत्न यंत्रणाकडून सुरू आहे.
