जावयाने केली सासऱ्याची हत्या; आरोपीला अटक

Shabd Sandesh
0
जावई आणि सासऱ्यामध्ये वादानंतर झालेल्या मारहाणीत सासऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास अहेरी तालुक्यातील महागाव येथे घडली.

गडचिरोली शब्दसंदेश न्यूज, दि.१५

जावई आणि सासऱ्यामध्ये वादानंतर झालेल्या मारहाणीत सासऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास अहेरी तालुक्यातील महागाव येथे घडली. आरोपी जावयाला अहेरी पोलिसांनी अटक केली आहे. रमेश पोचम दुर्गे (५५) राह. महागाव असे मारहाणीत मृत्यू झालेल्या सासऱ्याचे नाव आहे. तर चंद्रशेखर हिरालाल पवार (२५) राह. चितापूर तांडा, जिल्हा गुलबर्ग (कर्नाटक) असे आरोपी जावयाचे नाव आहे.
मयताची मुलगी आणि जावई कर्नाटकात राहायचे. ते मागील काही दिवसांपूर्वी महागाव येथे आले होते.१४ जून रोजी सासरे रमेश दुर्गे यांनी दारूच्या नशेत जावई चंद्रशेखर पवार यांच्यासोबत "तुम्ही इथे कशाला? आले" असा सवाल करत वाद घातला. त्या दोघांमध्ये यावेळी कडाक्याचे भांडण झाले. रागाच्या भरात चंद्रशेखर पवार यांनी सासऱ्याला मारायला सुरुवात केली. चंद्रशेखरची पत्नी  आपल्या वडील आणि पतीमध्ये सुरू असलेले भांडण सोडवायला गेली. मात्र जावई याने रागाच्या भरात लाथा बुक्क्याने सासऱ्याच्या डोळ्यावर, छातीवर, पाठीवर, तोंडावर बेदम मारहाण केली. यात सासरा रस्त्याच्या कडेला पडला. त्यानंतर सुद्धा जावयाने मारहाण केल्याने सासऱ्याच्या यात मृत्यू झाला. या घटनेच्या पुढील तपास ठाणेदार हर्षल एकरे करीत आहेत.
  सासऱ्याचे पत्नी सोबत सतत वाद
सासरे रमेश दुर्गे यांचे त्याच्या पत्नीसोबत नेहमी वाद व्हायचे. यापूर्वी झालेल्या पती-पत्नीच्या वादात रमेश ची पत्नी माया गंभीर जखमी झाली होती. त्यावेळी सासऱ्यावर पत्नीला मारहाण केल्याने त्याच्यावर गुन्हा देखील दाखल होता.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)