ट्रॅक्टर चोरट्यास केले जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखा पथकाची कारवाई

Shabd Sandesh
0
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने  ट्रॅक्टर चोरी करणारे आरोपीतांचा केला पर्दाफाश 
शब्दस न्यूज गोंदिया, दि.२१
🔹तक्रारदार उमेश रहांगडाले रा. पालडोंगरी तालुका तिरोडा  जि. गोंदिया व्यवसाय- शेती  यांनी पोलीस ठाणे तिरोडा येथे तक्रार दिली कि, दि. १९ जून २०२५ चे  रात्र दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्यानी मौजा  पालडोंगरी येथील त्यांचे शेतातून इंडोफार्म कंपनीचा निळया रंगाचा ट्रॅक्टर किंमती ५,५०,०००/-रु. चा माल  चोरून नेल्याचे फिर्यादी यांचे तक्रारीवरून पो. ठाणे तिरोडा   येथे दिनांक- २०/०६/२०२५  रोजी अपराध क्र. ५२४/२०२५  कलम ३०५(२ ) भारतीय न्याय संहिता नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता व आरोपीचा शोध सुरु होता .  
      स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक सदर गुन्ह्याचे समांतर तपास करीत असताना दिनांक २०/०६/२०२५ रोजी गोपनीय माहितगाराकडून माहिती मिळाली की, आरोपी हे ट्रैक्टर चोरी करून मौजा कवलेवाडा दिशेने गेले आहेत तसेच तांत्रीक माहीती माहितीच्या आधारे नामे राकेश मुरलीधर राहांगडाले यथ-३९ वर्ष, रा. घरसंसार सोसायटी, नविननगर, पारडी, नागपूर यास ताब्यात घेण्यात आले  व  त्यास चोरीस गेलेल्या  द्रक्टर बाबत विचारपूस करण्यात आली असता त्याने सांगीतले की, तो त्याचे दोन साथीदार नामे सुधाकर धनराज कटरे व कृष्णा चैतराम आंबाडारे दोन्ही रा. येरली तालुका तुमसर जि. भंडारा यांच्यासह दि.१९ जून २०१५ रोजी मौजा बघोली ( परसवाडा ) येथे नातेवाईकाकडे जेवण करणेकरीता गेले होते. व परत जात असताना मौजा पालडोंगरी गावाचा बाहेर शेतात उभा असलेला ट्रॅक्टर चोरी करून तुमसर येथे घेऊन गेले असे  सांगीतल्याने व गुन्हा केल्याचे कबुल केल्याने  त्यांचे ताब्यातून खालीलप्रमाणे गुन्हयात चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला. अंदाजे कि. ५,५०,000/- रु एक इंडोफार्म कंपनीचा निळया रंगाचा ट्रॅक्टर, गुन्ह्यात वापरलेली अंदाजे कि. ७०,००० /- रु होंडा कंपनीची ड्रीम युगा मोटर सायकल असा एकूण किंमती ६,२०,०००/-रु. चा मुद्देमाल हस्तगत करून गुन्ह्यात जप्त करण्यात आले आहे. वरील नमूद तिन्ही आरोपीतांना पोलीस ठाणे तिरोडा यांचे ताब्यात देण्यात आले असून पुढील कायदेशीर कारवाई तिरोडा पोलीस करीत आहेत..
सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक गोंदिया, गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक गोंदिया नित्यानंद झा यांचे निर्देश सूचनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  पुरुषोत्तम अहेरकर यांचे मार्गदर्शनात पोलीस पथक पोउपनि. वनिता सायकर, अंमलदार इंद्रजित बिसेन,  सुबोध बिसेन, दीक्षितकुमार दमाहे, चापोशी राम खंदारे यांनी कारवाई केलेली आहे.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)