अव्यवस्थेमुळे नागरिक त्रस्त; स्मशानात नागरिकांच्या हातात कॅन
देवरी,शब्दसंदेश न्यूज दि.१२
गोटाबोडी गावातील स्मशानभूमीत पाण्याची व्यवस्था नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. ही गैरसोय लक्षात घेऊन येथील स्मशानभूमीत ग्रामपंचायतने पाणी पुरवठा उपलब्ध करून देण्याच्या मागणीला जोर आला आहे. स्मशानभूमीत हातपंप असला तरी पंपाला पाणी नसल्याने मृतकांच्या नातेवाईकांची आरडाओरड सुरू आहे.
स्मशानभूमीत पाण्याची सोय नसल्याने ग्रामपंचायतीच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. गोटाबोडीवाशीयांना नेहमी पाहण्यासाठी यातना भोगावे लागत आहे. पाणीटंचाई असल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वन वन भटकावे लागत आहे. तर गोटाबोडी येथील करोडो रुपयाची जल जीवन मिशन योजना फोल ठरली आहे. टँकरने पाणी विकत घ्यावे लागणार असल्याची वेळ आली आहे. ग्रामपंचायत गोटाबोडी समशानभूमीतही पाण्याची व्यवस्था नसल्याची बाब समोर आली आहे. स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी पाण्याची आवश्यकता असते. परंतु, स्मशानभूमीत पाणी उपलब्ध नसल्यामुळे लोकांना वणवण फिरावे लागत असल्याची माहिती समोर आली आहे. स्मशानात येताना येथिल नागरिकांना हातामध्ये पाण्याची कॅन सोबत आणावी लागत आहेत. याकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. गोटाबोडी गावातील स्मशानभूमीला तातडीने पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येण्याची मागणी जोर धरू लागली आहे.