झाडाच्या फळ धारणेवरूनही पाऊस कोसळण्याचा अंदाज

Shabd Sandesh
0
आम्रवृक्षाला फळे भरपूर, त्यावर्षी पाऊस ओढ देणार
शब्दसंदेश न्यूज देवरी, दि.०२: भारत देश हा ऋषीमुनी, संत, तपस्वींचा देश आहे. या देशात ग्रामीण भागात आजही पूर्वी पाळली जाणारी परंपरा कायम ठेवत आहेत. कुठे पक्षी घर बांधण्यावरून तर कुठे प्राण्यांच्या, पक्षांच्या आवाजावरून पाऊस कोसळण्याचा अंदाज व्यक्त केला जातो. तर काही गावात झाडाच्या फळ धारणेवरूनही पाऊस कोसळण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आता आम्रवृक्षाला फळे भरपूर त्यावर्षी पाऊस ओढ देणार असे वयोवृध्दांकडून सांगितले जात आहे. काय खरे काय खोटे हे अंदाजही व्यक्त करणाऱ्यांनी सांगितले आहे.

  आधुनिक युग हे तंत्रज्ञानाचे युग असले तरी हवामान खात्यावरच पाऊस कोसळण्याचा अंदाज ठरविला जात असला तरी ग्रामीण भागात. पावसाचा अंदाज ठरविण्याची जुनी पद्धत आजही कायम आहे. जिल्ह्यात अधिकाधिक शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. निसर्गाच्या भरवशावर शेतकरी शेती करतात. यात शेतकऱ्यांना कमी अधिक पावसाचा फटका सहन करावा लागतो. यातून दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होते. यातूनही शेतकरी मार्ग काढतो. अशातच शेतकऱ्यांसह ग्रामीण भागात पावसाचा अंदाज पक्ष्यांच्या घरटी बांधणीवरून ठरविण्याची जुनी पद्धत आजही कायम आहे. यावर आजही त्यांचा अंदाज अचूक ठरताना दिसून येते. 

शेतकरी पूर्वीपासून अंदाजानेच शेती करीत असून त्यांचे ठरलेले अंदाज आजही खरे ठरणारे आहे. वर्षभर शेतात राबत असताना त्यांना एकप्रकारे निसर्ग पाठ झाल्याचे म्हणने वावगे ठरणार आहे. पावसाबाबत हवामान खात्यासह तज्ज्ञांनीही पावसाचे अंदाज वर्तविले आहेत. पण पावसाबाबत शेतकऱ्यांचे काही पारंपरिक अंदाज असतात. पूर्णपण नैसर्गिक आचरणावर आधारीत असलेले हे अंदाज आजही ग्रामीण भागात अचूक आणि खरे समजले जातात. पावसाळ्याच्या सुरुवातीला अनेक पक्षी आपली घरटी बांधतात. पक्ष्यांनी आपली घरटी झाडाच्या टोकावर बांधली की पाऊस कमी, झाडाच्या मध्यावर बांधली की, पाऊस मध्यम आणि पक्ष्यांनी आपली घरटी झाडाच्या खालच्या भागात, झाडाच्या ढोलीत बांधली की पाऊस भरपूर प्रमाणात होणार, असा एक पारंपरिक अंदाज त्यांच्याकडून बांधण्यात येते. कोकिळा आणि पावशा पक्षी घुमू लागले की, लवकरच पाऊस येणार, असा अंदाज वर्तविला जातो. बगळ्याची पांढरी पिसे तपकिरी रंगाची दिसू लागली तर त्यावर्षी पाऊस भरपूर पडणार, असे अनुमान लावले जातात. ज्यावर्षी आंब्याचे पीक भरपूर येणार त्यावर्षी पाऊस ओढ देणार, हे वर्षानुवर्षांचे अनुमान सांगितले जाते. 

पावसाची नक्षत्रे आणि त्यांची वाहने पंचांगानुसार दरवर्षी पावसाच्या नक्षत्रानुसार त्याचे वाहन बेडूक, म्हैस किंवा हत्ती असेल तर भस्पूर पाऊस, वाहन जर मोर, गाढव, उंदीर असेलतर मध्यम पाऊस आणि वाहन जर कोल्हा किंवा मेंढा असेल तर पाऊस कमी असे ठोकताळे बांधण्यात येते. वाहन जर घोडा असेल तर केवळ पर्वतीय भागात पाऊस पाडण्याचे संकेत समजले जाते. काही नैसर्गिक घटनांवरून त्या-त्या वर्षीच्या पावसाचे अनुमान लावण्यात येत आहे

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)