मलपुरी हत्या प्रकरण: आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश

Shabd Sandesh
0
   
स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया यांची कामगिरी
शब्दसंदेश न्यूज गोरेगाव:  तालुक्यातील ग्राम मलपुरी येथे दि. १८ एप्रिल २०२६ रोजी मृतक नामे उसेन सेवकराम रहांगडाले वय ६० वर्ष रा. मलपुरी हे सकाळी ०६.०० वाजेच्या सुमारास शेतात गेले होते. परंतु, घरी लवकर परत न आल्याने मृतकाची पत्नी मालनबाई रहांगडाले शेताकडे गेली. तेव्हा तिचा पती मलपुरी तलावाच्या रपटाच्या दगडावर पडुन असल्याचे दिसुन आले. तिने शेजारील लोकांना बोलाऊन पतीचे पाहणी करण्यात आली असता ते मृतावस्थेत असल्याचे व त्यांचे गळयावर धारदार शस्त्राने वार करुन त्यांचा कोणीतरी अज्ञात आरोपीनी खून केल्याचे समजले असता, थेट पोलीस ठाणे गाठून दिलेल्या तोंडी रिपोर्ट वरून पो.स्टे. गोरेगाव येथे अप. क्रमांक २४२/२०२६ कलम १०३(१) भारतीय न्याय संहीता चा गुन्हा दाखल केला. सदर गुन्हयात अज्ञात आरोपीचा गोरेगाव पोलिसांनी तपास सुरू केला. सदर घडलेल्या गुन्ह्याचा तपास करीत असताना गोपनिय माहीती तसेच तांत्रीक माहीतीच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यात आले असता गुन्हयातील आरोपी हे हेमराज चेतराम रहांगडाले व त्याचा मुलगा राहुल हेमराज रहांगडाले दोन्ही रा. सुकळी बेलदार (बूटीबोरी) नागपूर यांनी सदरचे खून केले असल्याचे समजले. 
     स्थानिक गुन्हे शाखेची दोन पथके रवाना
प्राप्त माहीतीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया येथील अधिकारी व अंमलदार यांची २ पथके तयार करुन तात्काळ बुटीबोरी नागपुर येथे आरोपी शोध घेणे कामी पथके रवाना केले. सदर दोन्ही आरोपींना दि. १९ एप्रिल २०२६ रोजी मोजा सुकळी बेलदार (बुटीबोरी) येथून ताब्यात घेऊन विश्वासात घेऊन विचारपुस केले असता आरोपी राहुल रहांगडाले याने सांगितले की मृतक नामे, उसेन रहांगडाले (वय ६०) याचे सोबत त्याचे कुंटुबाचे मागोल ५ वर्षापासुन घरच्या जागेवरुन वादविवाद सुरु होते. त्याचे कुंटुंबीय जेव्हा जेव्हा स्वगावी मलपुरी येथे आल्यास मृतक सोबत भांडण होत होते. त्याचा मनात राग धरुन आरोपी राहुल रहांगडाले व त्याचे वडील हेमराज रहांगडाले यांनी त्याचेकडे बुटीबोरी येथे कामाला असणारे राहुल जगराम कुंभरे (वय २३) रा. वार्ड न. ५, हनोतिया जि. छिंदवाडा मध्यप्रदेश, करण जगदीश नरें (वय २४) रा. पटनिया, त. जुन्नारदेव, जि. छिंदवाडा म.प्र., अभिषेक फुलनसा नरें (वय १९) रा. पटनिया, त. जुन्नारदेव, जि. छिंदवाडा म.प्र., विधिसंघर्ष बालक रा. मयारी, ता. जुन्नारदेव, जि. छिंदवाडा म.प्र. यांचेसोबत कट रचुन दि. १० एप्रिल २०२६ रोजी मारेक-यांना घटनास्थळी नेत जागेची माहीती देण्यात आली. आणि कशाप्रकारे ठार करण्याचे याचे नियोजन केले. 
      
नियोजन करीत केली हत्या
दि. १८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी बुटीबोरी येथून मौजा मलपुरी ता. गोरेगाव जि. गोंदिया येथे येऊन मृतकाचे शेतात उसेन रहांगडाले याचेवर धारदार हत्याराने वार करुन जिवीनिशी ठार केल्याचे कबुली दिली. यांना पुढील तपासकामी पो.स्टे. गोरेगाव यांचे स्वाधीन करण्यात आले आहे.
यांनी केली कारवाई
सदरची कारवाई गोरख भामरे, पोलीस अधीक्षक गोंदिया, अभय डोंगरे, अपर पोलीस अधीक्षक, गोंदिया यांनी दिलेले निर्देश सुचनाप्रमाणं स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पुरूषोत्तम अहेरकर यांचे मार्गदर्शनात स.पो.नि. धिरज राजूरकर, स.फौ. राजु मिश्रा, पो. हवा. दिक्षीतकुमार दमाहे, पो. हवा. महेश मेहर, पो. हवा. सुजित हलमारे, पो. हवा संजय चौहान, पोहवा तुलसीदास लुटे, पो. हवा. सुबोध बिसेन, पो. हवा. इंद्रजित बिसेन, पो. हवा, रियाज शेख, पो. हवा. सोमेन्दसिह तुरकर, पो. हवा. विठ्ठल ठाकरे, पो.शि. राकेश इंदुरकर, पो. शि. छगन विठ्ठले, पो. शि. संतोष केदार, पो. शि. हंसराज भांडारकर, पो. शि. दुर्गेश पाटील, चापोशि राम खंडारे, चापोशि घनश्याम कुंभलवार तसेच सायबर सेलचे पोशि रोशन येरणे, पोशि योगेश रहीले, पोशि आकीच काझी यांनी केली आहे.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)