ककोडीत जखमी अवस्थेत आढळली उडणारी खार

Shabd Sandesh
0

शब्दसंदेश न्यूज नेटवर्क देवरी, दि.१८ जुलै: तालुक्यातील चिचगड ककोडी रस्त्याच्या बाजूला दुर्मीळ समजली जाणारी उडणारी खार आढळल्याची घटना गुरुवारी (दि. १६) घडली.
चिचगडचे लोकमत प्रतिनिधी प्रा. महेश रहांगडाले यांनी याची माहिती वनरक्षक लोकेश टेंभरे व सुरेश रहांगडाले यांना दिली. त्यांनी घटनास्थळी पोहोचत जखमी खारीला ताब्यात घेत उपचार सुरू केले. वन्यजीव संरक्षण कायदा २०२२ च्या नवीन दुरुस्तीनुसार भारतात आढळणाऱ्या सर्व विशाल खारी आणि उडणाऱ्या खारी यांचा दुर्मीळ प्रजातीमध्ये समावेश करण्यात आला आहे. या प्राण्यांना कायदयाने संरक्षण प्राप्त आहे. यांची शिकार करणे, त्यांना पाळणे, इजा पोहोचविणे किंवा तस्करी करणे हा गंभीर गुन्हा आहे. जखमी उडणाऱ्या खारीवर केल्यानंतर जंगलात सोडले जाणार असल्याचे चिचगडचे वन परिक्षेत्र अधिकारी पी. बी. वाडे यांनी सांगितले.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)